sir


प्रदेश सचिव: महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती

मुख्याध्यापक: जिजामाता प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, आंबे ता.पंढरपूर

संस्थापक चेअरमन: सोलापूर जिल्हा माध्य.शाळा कृती समिती मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सह.पतसंस्था, पंढरपूर

मतदारसंघ: पुणे विभाग शिक्षक मतदार संघ

संपर्क कार्यालय: महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे कार्यालय,तनपुरे महाराज मठा शेजारी, पंढरपूर

मोबाईल नं.: ९९२२०९४०९९,७७०९१००५५५

ऑफिस: (०२१८६) २२७४७५

इ-मेल: datasawant121@gmail.com

मा.आमदार श्री.दत्तात्रय अच्युतराव सावंत

मा. आमदार श्री.दत्तात्रय अच्युतराव सावंत, जुलै २०१४ मध्ये झालेल्या पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत विजयी झाले. त्यांना विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहामध्ये काम करता आले. विधान मंडळातील सर्व राजकीय पक्षाने तालिका सभापती म्हणून त्यांची निवड झाली त्यामुळे त्यांना शिक्षणाच्या व शिक्षकांच्या प्रश्नावर शासनाला निर्णय घेण्यासाठी भाग पाडता आले. अजूनही अनेक प्रश्नावर त्यांचा पाठपुरावा चालू आहे. हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी लोकशाही मार्गाने त्यांचे प्रयत्न चालू आहेत.

शेतकरी कुटुंबातल्या सामान्य व कोणतंही राजकीय पाठबळ अथवा वारसा नसणाऱ्या कार्यकर्त्याला सहकार्यांच असं सच्च बळ मिळालं तर काय होऊ शकत याचं जागृत उदाहरण म्हणजे मा. आमदार श्री.दत्तात्रय अच्युतराव सावंत. शिक्षक पेशात काम करताना ऋषिमुनिंपासून साधूसंतांपर्यंत सर्वच ठिकाणी माहिती सांगणाऱ्या या शिक्षण क्षेत्रात प्रचंड बौधिकता आणि अभ्यासू नेत्यांची संख्या असताना, शासनाची हि उदासिनता का? या प्रश्नाने त्यांचे जीवन प्रश्नार्थक होतं? आंतरिक तळमळ व कार्यकर्त्यांचे मोठं पाठबळ आणि हातावर भाकर खायला तयार असणारी अनमोल मनाची सच्ची फौज, या साधनांची मैदानात उतरलेल्या त्यांच्यासारख्या शिक्षकाने वस्तूस्थिती लक्षात घेऊन, त्यांनी शिक्षकांच्या प्रत्येक प्रश्नावर कायम आधार घेतला तो पाच Wh चा. When,Why,Where,What,Who याचा त्यांच्या जीवनात त्यांनी सातत्याने वापर केला. हे असचं का? हे का नाही? आणि हेच व्हायला पाहिजे या प्रश्नांचा त्यांनी पाठलाग केला.

आमदार होण्यापूर्वी त्यांनी रस्त्यावरचा लढा उभारून विविध आंदोलने, उपोषणे करून ६०,००० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांना वेतन अनुदान मंजूर करून घेतले. गेले साडे पाच वर्षे सातत्याने काम करून विधिमंडळात विक्रमी प्रश्न सोडविण्याचा आमदार साहेब प्रयत्न करत आहेत. विविध आंदोलने, उपोषणे केली व ४११५३ कर्मचारी बंधू भगिनींना वेतन अनुदान मंजूर करून देण्यात आमदार साहेब यशस्वी झाले आहेत.

आमदार साहेबांनी केलेल्या कामांची यादी खालील प्रमाणे आहे.

  • दि.१ डिसेंबर २०१५ ते ११ डिसेंबर २०१५ या कालावधीत हजारो शिक्षकांना सोबत घेऊन संत नगरी शेगाव ते नागपूर २८७ किलोमीटर पायी दिंडी काढली व मुक्कामाच्या ठिकाणी भीक मागो आंदोलन केले.
  • दि.१ जून २०१६ ते ४ जून २०१६ या कालावधीत विनाअनुदानित कर्मचा-यांना वेतन मिळण्यासाठी आयुक्त कार्यालय पुणे येथे आमरण उपोषण केले परिणामी आमदार साहेबांच्या किडनीवर कायमचा परिणाम झाला तरीही तमा न बाळगता विध्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या प्रश्नासाठी लढत राहिले.
  • दि.१७ जुलै २०१७ ते २३ जुलै २०१७ या कालावधीत मुसळधार पावसात, पुणे येथील भिडे वाडा ते शिक्षण मंत्री सेवासदन बंगला मुंबई पर्यंत १६५ किलोमीटर पायी दिंडी काढून प्रश्न मार्गी लावले.
  • वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी कठीण अटी असणारा २३ ऑक्टोबर २०१७ चा शासन आदेश अधिक्रमित करून वरिष्ठ व निवड श्रेणी देण्याचा शासन आदेश करून घेतला.
  • दि.१२ डिसेंबर २०१९ ते ते १६ डिसेंबर २०१९ या कालावधीत दि.१ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी वर्धा ते नागपूर ८१ किलोमीटर पायी दिंडी काढली होती.
  • १ नोव्हेंबर २००५ नंतर नेमणूक असलेल्या कर्मचारी बांधवांसाठी जुनी पेन्शन योजना मिळविण्यासाठी सर्व विभागातील कर्मचा-यांना एकत्र करून आंदोलने केली आहेत. तसेच विधानभवन स्तरावर पाठपुरावा चालू आहे.
  • आश्रमशाळेतील शिक्षकांना ७ वा वेतन लागू करण्यासंदर्भात सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित करून तसेच मंत्रीमहोदयांकडे निवेदन देऊन ७ वा वेतन आयोग लागू करून घेतला.
  • आश्रमशाळेतील कर्मचा-यांना सुद्धा शालेय शिक्षण विभागातील कर्मचा-यांप्रमाणेच वैद्यकीय प्रप्तीपुर्ती योजना देणेबाबत प्रयत्न करून यश मिळविले आहे.आश्रमशाळेतील १४८ कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचे वेतन सुरु करण्यासाठी शेगाव ते नागपूर पायी दिंडी काढून या शिक्षकांचे वेतन सुरु करून घेतले.
  • १०-२०-३० ची श्रेणी वाढ देण्यासाठी कमिटी नेमण्यास भाग पडले.
  • शासन स्तरावर पाठपुरावा करून १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त कर्मचा-यांसाठी DCPS/NPS मध्ये शासन हिश्याची तरतूद करण्यासाठी शासनास प्रवृत्त केले.
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२० मध्ये दि.५ मार्च २०२० रोजी वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांचा संप काळातील ७१ दिवसाच्या वेतनाबाबत लक्षवेधी सूचना मांडून मा.मंत्री उच्च व तंत्र शिक्षण यांचे कडून ७१ दिवसाचे वेतन देणे बाबत आश्वासित करून घेतले.
  • कोल्हापूर,सांगली,सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्त बाधित ३०० शाळांला व शाळेतील विध्यार्थ्यांना ४० लाख रुपये किंमतीचे शैक्षणिक साहित्याचे वाटप सामाजिक सहभागातून “ बांधिलकी सामाजिकतेची लढा शिक्षणाचा ” या उद्देशाने केला आहे.

असे एक ना अनेक प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार साहेब दररोज चोवीस तासांपैकी किमान १६ ते १८ तास दररोज काम करत असतात.आमदार साहेबांनी आतापर्यंत अनेकदा शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे, आझाद मैदान मुंबई, संचालक कार्यालय, विधानभवन मुंबई येथे आंदोलने, उपोषणे करून अनेक विषय मार्गी लावले आहेत.सगळेच प्रश्न सुटतील असे आमदार साहेब मुळीच म्हणत नाहीत परंतु काही प्रश्न सुटण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. अनेक वर्षापासून शाळांचे बंद असलेले वेतनेतर अनुदान मिळवून दिले आहे. सर्व शाळांचे वेतन दर महिन्याचे १ तारखेला मिळविण्यासाठी शासन आदेश पारित करून घेतला आहे. वैद्यकीय बिले कॅशलेस योजनेतून मिळण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न चालूच आहेत.